जे.सी.बी. इंडिया लि: तळेगाव कर्मचारी संघटनेची त्रैवार्षिक निवडणक संपन्न.
बोल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड। प्रतिनिधी
विजयी उमेदवार व मिळालेली मते १)विनोद फले ३५५ २)किरण पाटील २१४, २)मोहन कटारे ३०७, ४)सुरेश शिदे २०३, ५)अमोल कुडले ३००, ६)संतोष डांगवे ३०, ७)खंडेराव जाधव २९३, ८)राहुल पिंळे २१२, ९)विजय कळसकर २७४, १०)विनोद बिबवे२७४, ११)गोपाल जाधव २७१ जे.सी.बी. इंडिया लि. तळेगाव कर्मचारी संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक अंत्यत उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली.
शनिवारी (दि. १ ऑगस्ट) झालेल्या मतमोजणी नंतर निकाल जाहीर करण्यात आला. संघटनेच्या एकूण ५२३ सभासदापैकी ५२० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे सुमारे ९९.४३ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्याच्या समर्थकांनी घोषणाबाजी. पुष्पहार, मिठाई वाटप आणि जल्लोष करून विजय साजरा केला. कंपनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विजया नंतर कामगार प्रतिनिधींनी सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानत, कामगारांचे हित जपणे. संघटनेचा पारदर्शक कारभार, कामगाराच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि व्यवस्थापनाशी सकारात्मक संवाद ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व कर्मचारी वर्गाला विश्वासात घेऊन ‘संघटना चालविण्याचा निर्धार व्यक्त केला. जे.सी.बी” इंडिया लि. कर्मचारी संघटनेच्या निवडणुकीकडे कंपनीतील कर्मचारी तसेच औद्योगिक क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते.










