🔴 जिल्हा अमरावती तालुका अचलपुर मधील परतवाड्यातील नॅशनल कॉन्व्हेंट स्कूलचा धक्कादायक प्रकार! चिमुकलीला ‘मतिमंद’ म्हटल्याचा आरोप – विशेष शिक्षिकेने दिला शाळेला दणका
अमरावती जिल्हा प्रतिनिधी पत्रकार फिरोज कुरेशी
४ दिवसांपासून चिमुकली रुग्णालयात दाखल; पालकांचा न्यायासाठी टाहो**मंडल उदय वृत्तसेवा**परतवाडा, ता. अचलपूर :* सायमा कॉलनी, परतवाडा येथील नॅशनल कॉन्व्हेंट स्कूलमधून एक अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीला शिक्षकाने *’मतिमंद’ आणि ‘वेडी’* म्हटल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.पित्याचा आरोप आहे की, शिक्षकाने त्यांच्यासमोरच “तुमच्या मुलीला शाळेत पाठवू नका” असे सांगितले. या घटनेनंतर गेल्या १५ दिवसांपासून ती चिमुकली शाळेत गेली नाही. या मानसिक धक्क्यामुळे ती गेल्या *४ दिवसांपासून परतवाड्यातील ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचा दावा* पालकांनी केला आहे.*पंचायत समितीच्या विशेष शिक्षिका म्हणतात – “मुलगी १००% नॉर्मल आहे”*या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा झाला आहे. पंचायत समिती अचलपूरच्या *विशेष शिक्षिका श्रीमती शालिनी होळकर मॅडम* यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले -> “मला शाळेतूनच कॉल आला होता की, आमच्या शाळेत अशी एक मुलगी आहे, तपासणीसाठी या. मी शाळेत जाऊन वर्गशिक्षिकेला स्पष्ट सांगितले की, तुम्ही ‘मतिमंद’ शब्द वापरूच शकत नाही. या शब्दाचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे का? हा शब्द वापरणे अपमानजनक आहे. तपासणीत मुलगी १००% व्यवस्थित आहे, फक्त अभ्यासात थोडी मागे आहे, बाकी सर्व ऍक्टिव्हिटी वयाच्या मानाने नॉर्मल आहे.”विशेष शिक्षिकेने समज देऊनही शाळा प्रशासन आता *”आमच्या शाळेत असा कोणताही प्रकार झालाच नाही”* असे सांगून हात झटकत असल्याचा आरोप आहे. मग प्रश्न असा आहे की, शाळेनेच फोन करून पंचायत समितीच्या मॅडमला का बोलावले? शाळा प्रशासन खोटं बोलत आहे का?*संस्थाचालकांचे उत्तर – “तिला मतिमंदांच्या शाळेत टाका”*पालकांच्या म्हणण्यानुसार शाळेचे अध्यक्ष सलीम सर यांनी “हिला मतिमंदांच्या शाळेत टाका” असे सांगितले.*पालकाची व्यथा – “आम्हाला न्याय द्या”*या प्रकरणी मुलीचे वडील *मो. जुल्फिकार मो. युसूफ, रा. परतवाडा* यांनी सांगितले की, या घटनेमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि माझ्या मुलीच्या किंवा कुटुंबाच्या जीविताला काही बरे-वाईट झाले तर याला संबंधित शाळा प्रशासन जबाबदार राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नातेवाईकांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी अचलपूर, जिल्हाधिकारी अमरावती, CEO अमरावती आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार देण्यात आली आहे.*शाळा ही संस्काराची जागा आहे, तिथेच जर चिमुकलीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचत असेल तर शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.*










