बहुभाषिक भारतात भाषा आधारित करिअरच्या नाविन्यपूर्ण संधी : सूरज मानेशंकरराव मोहिते महाविद्यालयात हिंदी दिवस सप्ताहाची उत्साहात सांगता; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव
बोल महाराष्ट्र न्यूज | विशेष प्रतिनिधी, अकलूज | अरुण गुजर

बहुभाषिक भारतामध्ये विविध भाषांचे ज्ञान, प्रभावी संवादकौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातल्यास विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या अनेक नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध होऊ शकतात. केवळ पदवी मिळविण्यापेक्षा बदलत्या काळानुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे ही आजच्या रोजगारविश्वाची गरज आहे, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी श्री. सूरज माने यांनी केले.शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथील हिंदी विभागाच्या वतीने १५ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या हिंदी दिवस सप्ताहाची सांगता २१ सप्टेंबर रोजी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सूरज माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर होते.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हिंदी दिवस सप्ताहात विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण २५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावकेंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, आयबीपीएस, आयुर्विमा कंपन्या, सीमा सुरक्षा दल, इंडियन पोस्ट आदी क्षेत्रांतील प्रवेश परीक्षांच्या धर्तीवर हिंदी माध्यमातून सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यासोबतच विद्यार्थ्यांच्या भाषिक, सर्जनशील आणि कलात्मक गुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी शेरो-शायरी प्रस्तुतीकरण, फिल्मी डायलॉग प्रस्तुतीकरण, जाहिरात प्रस्तुतीकरण, हिंदी जोक्स प्रस्तुतीकरण आणि पोस्टर प्रदर्शन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.पोस्टर प्रदर्शनासाठी ‘देश के विकास में युवा शक्ति का दायित्व’, ‘सायबर सुरक्षा एवं उपाय’, ‘राष्ट्रभाषा हिंदी का महत्व’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) लाभ और हानि’ हे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या विषयांवर आकर्षक आणि माहितीपूर्ण पोस्टर सादर केले.‘२१ व्या शतकात हिंदीतील रोजगार’ विषयावर मार्गदर्शनप्रमुख पाहुणे श्री. सूरज माने यांनी ‘२१ व्या शतकात हिंदीतील रोजगार’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या ओघवत्या आणि शायराना शैलीत त्यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या विविध संधींची माहिती दिली. शिक्षणासोबतच संवादकौशल्य, भाषिक कौशल्य, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी यांना आजच्या काळात विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांनी बदलत्या रोजगारविश्वाचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या नव्या करिअर संधींचा अभ्यास करून स्वतःमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करावीत, असे आवाहन केले.यावेळी मुस्कान सय्यद, तमन्ना तिकोटे, शिवमंगल कश्यप, दिव्या गिरी, महादेव वाघमोडे आणि मेघा बडे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.स्पर्धांतील विजेतेसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा :प्रथम — ओंकार संतोष खरे, बी.ए.१द्वितीय — कन्हैया लहू सुगावकर व एकता सचिन राजमाने, बी.ए.१तृतीय — शिवमंगल जोगेश्वर कश्यप, बी.ए.२; हिना राजू शेख, बी.ए.३; सिद्धी कुंडलिक किर्ते, बी.ए.१.शेरो-शायरी प्रस्तुतीकरण :प्रथम — मुस्कान अन्वर सय्यद, बी.ए.३द्वितीय — शिवमंगल जोगेश्वर कश्यप, बी.ए.२तृतीय — मेघा संतोष बडे, बी.ए.३.फिल्मी डायलॉग प्रस्तुतीकरण :प्रथम — साहिल शहाजी भिवरकर, बी.ए.३द्वितीय — गौरी विज्ञान लोंढे, बी.ए.३तृतीय — यश महेश सुरवसे, बी.ए.३.जाहिरात प्रस्तुतीकरण :प्रथम — संध्या सत्यवान गायकवाड, बी.ए.३द्वितीय — दिव्या अशोक गिरी, बी.ए.३तृतीय — विश्वराज अमरसिंह मोहिते, बी.ए.१.हिंदी जोक्स प्रस्तुतीकरण :प्रथम — वर्षा संतोष फराडे, बी.ए.२द्वितीय — सिद्धी कुंडलिक किर्ते, बी.ए.१तृतीय — विश्वराज अमरसिंह मोहिते, बी.ए.१.पोस्टर प्रदर्शन :प्रथम — अमृता अनिल दुधाळ, बी.ए.२द्वितीय — सायली सुनील दुधाळ, बी.ए.२तृतीय — प्रीती तानाजी कांबळे, बी.ए.३ व सृष्टी गणेश शेलार, बी.ए.२.विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकासाठी गोल्ड मेडल व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी सिल्वर मेडल व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकासाठी ब्राँझ मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. सूरज माने व प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.या विविध स्पर्धांसाठी डॉ. विश्वनाथ आवड, डॉ. संजय वाघमारे, डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. अण्णासाहेब नलवडे, डॉ. विजयकुमार शिंदे, डॉ. उत्तम वाघमोडे, प्रा. विनायक माने आणि प्रा. धिरज गुरव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.स्पर्धांचे निकाल हिंदी विभागप्रमुख डॉ. निवृत्ती लोखंडे यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी लोंढे हिने केले. यश सुरवसे याने प्रास्ताविक केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय जिया शेख हिने करून दिला. संध्या गायकवाड हिने आभार मानले.हिंदी दिवस सप्ताहाच्या आयोजन-नियोजनासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. सयाजीराजे मोहिते-पाटील व सर्व समिती सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दादासाहेब कोकाटे, प्रा. रणजीत लवटे, डॉ. पल्लवी मिसाळ, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार राजेंद्र बमणे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.📸 फोटो कॅप्शनअकलूज : शंकरराव मोहिते महाविद्यालयात हिंदी दिवस सप्ताहाच्या सांगता समारंभात विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर, प्रमुख पाहुणे श्री. सूरज माने, हिंदी विभागप्रमुख डॉ. निवृत्ती लोखंडे, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.










