तहसीलदाराचा अजब प्रताप सही विना निलंबन प्रस्ताव,
बोल महाराष्ट्र न्यूज उपसंपादक हिंगोली जिल्हा – विलास पाटील
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तहसील कार्यालयाचे तहसीलदार हरीश गाडे यांनी मौजे जामगव्हाण येथील रास्त भाव दुकानदार ज्ञानेश्वर तुळशीराम मोरे यांच्या नावाने 2024 एप्रिल महिन्याचे धान्य 100% वाटप न केल्याच्या कारणावरून तहसील कार्यालयातून त्यांना नोटीस देण्यात आली परंतु त्या नोटीसीवर तहसीलदार हरीश गाडे असे छापील नाव असून स्वाक्षरी मात्र नाही काही राजकीय नेत्यांच्या दबावावरून व तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे दलाल यांच्या सांगण्यावरून दुकान निलंबित करण्यात आले, निलंबित झालेले दुकान गावापासून दहा ते पाच किलोमीटर अंतरावरील दुकानाला जोडून धान्य वितरित करण्याचा नियम आहे परंतु तहसीलदार यांनी गावापासून वीस ते पंचवीस किलोमीटर लांब असलेल्या सुरेगाव येथील स्वस्त धान्य तालुका संघटना अध्यक्ष यांच्या नावे जोडून जामगव्हाण येथील लाभार्थ्यांना धान्य आणण्यासाठी 20 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे, सदर निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी न करता तहसीलदार हरीश गाडे यांनीच केल्याची निदर्शनास येत आहे, रास्त भाव दुकान निलंबना मुळे जामगव्हाण येथील बऱ्याच प्रमाणात नागरिक धान्यापासून वंचित राहत आहेत असे चित्र दिसते आहे,










