शिर्डी येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात संपन्न. चंद्रकांत उदगीरे यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार देण्यात.
आले.शिर्डी प्रतिनिधी- शिर्डी, दि. ०६ सप्टेंबर २०२६
Be The Change Foundation आयोजित *राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६* हा कार्यक्रम *रविवार, दिनांक ०६ सप्टेंबर २०२६* रोजी *शिर्डी* येथील साई पालखी निवारा येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या भव्य सोहळ्यामध्ये *“महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६”*, *“राज्यस्तरीय सौंदर्य कला पुरस्कार २०२६”* तसेच *“आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६”* या तीन मानाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, शासकीय व खाजगी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, कलाकार, उद्योजक तसेच समाजसेवकांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून सहभागी झालेल्या गुणवंत, कर्तव्यनिष्ठ व समाजाभिमुख व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून *सुभेदार मेजर मा. श्री. सुनील मोहोड, अभिनेत्री निवेदिता पगार, श्री. अरुण भंडारे, डॉ. निलेश गायकवाड, ॲडव्होकेट योगेश दवंगे, श्री. निलेशजी घोडेचोर, शुभांगी थोरात, श्री. प्रवीण मते तसेच श्री. अमृत रोहोम* आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच संस्थेचे *अध्यक्ष श्री. मयूर ढोकचौळे व सचिव रचना ढोकचौळे* यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील नागरिक, शिक्षक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.










