श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित मराठवाडा विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार व 1 लाख रुपये रक्कम लऊळ येथील श्री कुर्मदास विद्यामंदिर विद्यालयास प्राप्त …….
दिनेश शिंदे / लऊळ प्रतिनिधी
लऊळ
ता. माढा येथील श्री कुर्मदास विद्यामंदिर लऊळ या विद्यालयास मराठवाडा विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून शाळेची गुणवत्ता पाहता हा पुरस्कार मिळाला असून या बरोबरच 1 लाख रुपयांचा चेक मिळाला असून या विद्यालयाच्या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मुख्याध्यापक बिले सर यांचा सन्मान शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास अण्णा घुगे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी पर्वेक्षक सुनील गरदडे, सतीश मांदे, विठ्ठल मोहिते,तानाजी धीमधिमे ,पत्रकार दिनेश शिंदे,राजेश चव्हाण ,सतीश गवळी ,गणेश लोकरे आदी पालक उपस्थित होते










