विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर व्होळे खु गावातील सभासदांना पुन्हा हुलकावणे
प्रतिनिधी माढा. कुंदन वजाळे.
माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची २७वी सर्वसाधारण सभा पिंपळनेर येथे संपन्न झाली त्यामध्ये स्वीकृत सदस्य संचालक पदी ७ जणांची वर्णी मात्र व्होळे गावचे एक ही संचालकपदी निवड झाली नाही. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार बबनदादा शिंदे यांना प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान व्होळे गावातून होत आहे. मात्र विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात स्थान मिळत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार संचालक पदासाठी तीन नावे होते मात्र काही राजकीय वादामुळे ते मागे पडले असल्याचे कळले. यावेळी बोलताना माजी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की गेल्या ३० वर्षेच्या विकासावर शंका घेणाऱ्यानी डोळे तपासावेत तसेच शेतकऱ्यांना १०० रुपये अतिरिक्त तर लिफ्ट योजनेचे वीज बिल भरण्यासाठी प्रत्येक टनास ५ रुपये जादा भाव मिळणार आहे.










