स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री कुर्मदास विद्यामंदिर लऊळ येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी कैलास अण्णा घुगे यांची बहुमताने निवड ……. ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
दिनेश शिंदे /सोलापूर जिल्हा प्रतिनिधीलऊळ
ता.माढा येथे श्री कुर्मदास विद्यामंदिर येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी कैलास अण्णा घुगे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल नागरिक व पालकांकडून सन्मान करण्यात आला यावेळी गावचे सरपंच पवन भोंग विद्यालयाचे मुख्याध्यापक बिले सर, पर्वेक्षक सुनील गरदडे माजी ग्रामपंचायत सदस्य मधूकर घुगे,चेअरमन कैलास घुगे, पत्रकार दिनेश शिंदे,भाऊ नाना घुगे, सिद्धेश्वर घुगे, तिरुपती गणगे , अजिनाथ आवताडे, अमोल लंगोटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ओम परमेश्र्वर गणगे या विद्यार्थ्यांने शाळांतर्गत परीक्षेत राज्यस्तरावर क्रमांक पटकवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वामी जी एम यांनी केले ..










