बोल महाराष्ट्र न्यूज | विशेष प्रतिनिधी, अकलूज | अरुण गुजर अकलूज, दि. ९ ऑगस्ट २०२६ :
कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त अकलूज येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य शिबिराचा १,२७५ रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये ७६५ महिला आणि ५१० पुरुष रुग्णांचा समावेश होता. अकलूजसह माळशिरस तालुक्यातील तसेच लगतच्या तालुक्यांमधूनही मोठ्या संख्येने रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक तथा युवानेते सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शिबिराचे आयोजक तथा नगरसेवक युवानेते सयाजीराजे मोहिते-पाटील, डॉ. एम. के. इनामदार, डॉ. सतीश दोशी, डॉ. अपर्णा सरवदे, डॉ. सुरेश सूर्यवंशी, डॉ. अमोल शिंदे, डॉ. सचिन सावंत, डॉ. सविता गुजर, डॉ. रेवती राणे, डॉ. अपूर्व गिरमे, डॉ. ज्योत्स्ना गायकवाड, डॉ. भूषण चंकेश्वरा, डॉ. विश्वास कदम, डॉ. रावसाहेब गुळवे, डॉ. साईराज भोंगळे, डॉ. अरुंधती खराडे-पाटील, डॉ. अभिजीत राजेभोसले, सहकार महर्षी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक व मान्यवर उपस्थित होते.कर्करोगासह विविध आजारांची तपासणीसयाजीराजे मित्र मंडळ, अकलूज, शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलूज, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी, उपजिल्हा रुग्णालय, अकलूज तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये कर्करोग, नेत्ररोग, अस्थिरोग, हृदयरोग तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. विशेषतः महिलांच्या आरोग्याची तपासणी आणि कर्करोगाचे प्राथमिक निदान यावर भर देण्यात आला.महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृतीची गरजशिबिराचे प्रस्ताविक करताना आयोजक सयाजीराजे मोहिते-पाटील म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असून महिलांमध्ये स्तनाचा तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक आहे. अनेक महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.महिलांच्या मनातील कर्करोगाची भीती दूर व्हावी, आजाराचे प्राथमिक अवस्थेत निदान व्हावे आणि निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचार वेळेत मिळावेत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कर्करोगासह नेत्ररोग, अस्थिरोग, हृदयरोग व रक्ताशी संबंधित आजारांची मोफत तपासणी करून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.‘एका रुग्णाचा जीव वाचला तरी शिबिराचे यश’डॉ. एम. के. इनामदार यांनी कर्करोगाबाबत नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचाराची दिशा निश्चित करता येते. या शिबिरातून एखाद्या रुग्णाचा जीव वाचला तरी या उपक्रमाचे खरे यश मानता येईल, असे त्यांनी नमूद केले.डॉ. रेवती राणे यांनी कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. महिला आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा महिलांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरामुळे महिलांचा वेळ आणि वैद्यकीय तपासणीवरील आर्थिक खर्चही वाचणार असल्याचे त्यांनी नमूद केले.१५ दिवसांची मोफत औषधे; मोतीबिंदू शस्त्रक्रियाही मोफतशिबिरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांना शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीने १५ दिवसांची मोफत औषधे देण्यात आली. तसेच भविष्यात गरजू रुग्णांसाठी ट्रस्टच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.या आरोग्य शिबिरास कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूजचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील, श्री. दीपकराव खराडे-पाटील तसेच श्री. प्रदीपराव खराडे-पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. डॉ. अभिजीत राजेभोसले यांनी आभार मानले.अकलूज व परिसरातील नागरिकांसाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.











