पाथरोट जि. प. उर्दू शाळेला तलावाचे स्वरूप; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात.
बोल महाराष्ट्र न्यूज इम्रान सौदागर पाथरोट
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाथरोट येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. संपूर्ण शाळेच्या मैदानाला आणि अंगणवाडीसमोरील परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले असून, यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.शाळेच्या परिसरात पसरली तीव्र दुर्गंधीपाथरोटमधील आठवडी बाजार परिसरात असलेल्या या जिल्हा परिषद उर्दू शाळेत ३०० च्या वर विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. मुसळधार पावसामुळे शाळेचे मैदान पाण्याखाली गेले असून मुख्य भागात अजूनही पाणी साचलेले आहे. या साचलेल्या घाण पाण्यामुळे संपूर्ण शालेय परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.प्रशासकीय निष्काळजीपणावर पालकांचा तीव्र संतापमुला-मुलींच्या खेळण्याच्या आणि वावरण्याच्या जागेवरच घाण पाणी साचल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन पाण्याचा निचरा करावा आणि परिसरात जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असताना संबंधित शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासन आता तरी तातडीने पावले उचलणार का, की एखाद्या मोठ्या अनहोनीची वाट पाहत आहे? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.










