शिर्डीतील पाच दिव्यांग स्टॉलचे बच्चू भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन
जिल्हा प्रतिनिधी शिवाजी दवणे बोल महाराष्ट्र न्यूज 9730170965.
शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिराच्या तीन नंबर गेट समोर शिर्डी नगर परिषदेच्या वतीने पाच दिव्यांग बांधवांना स्टॉलचे उद्घाटन प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विधान परिषदेचे आमदार बच्चुभाऊ कडू शिर्डी नगरपालिकेचे उप नगराध्यक्ष अभय राजे शेळके राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.बच्चू भाऊंयांनी आपल्या भाषणात सांगितले की 2021 पासून उपोषण आंदोलन कागदपत्राचा पाठपुरावा करून प्रहार दिव्यांग संघटनेच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आले फूटपाथ वरील बसणाऱ्या पाच दिव्यांग बांधवांना माजी खासदार सुजय दादा विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने शिर्डी नगरपरिषदेच्या सहकार्याने स्टॉल देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा ग्रामपंचायत पंचायत समिती यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पाच टक्के आरक्षण ठेवलेच पाहिजे त्यामुळे काही प्रमाणात दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभा राहून आपला व्यवसाय वृद्धिंगत करू शकेल त्या अधिवेशनात सरकारकडे ही मागणी करण्यात येणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा अनिता जगताप राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब राज्य सचिव सुरेश मुकल साहेब जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे साहेब प्रहार अकॅडमीची संस्थापक अध्यक्ष मेजर विनोद सिंग परदेशी पुणे विभाग संपर्कप्रमुख विजय राऊत महेश बडे साहेब महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख संपर्कप्रमुख पांडुरंग कासार ऍड पांडुरंग औताडे आप्पासाहेब ढूस सांगळे पाटील जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष अमोल बानाईत शहराध्यक्ष कैलास यादव तालुका सचिव सुरेश गुगळे महिला तालुकाध्यक्ष सौ. अस्विनी विखे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मगर सर कोपरगाव तालुका अध्यक्ष शरद खिल्लारे संगमनेर तालुकाध्यक्ष दत्तात्रेय लोंढे गणेश शेळके राहुरी तालुका संघटक भरत आढाव जगन्नाथ हापसे आदी पदाधिकारी उपस्थित होते शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभय सतीश दिघे साहेब नगराध्यक्षा सौ जयश्री थोरात सर्व नगरसेवक श्री साईबाबा विश्वस्त संस्था यांचे मनापासून आभार शहराध्यक्ष कैलास यादवडे यांनी मानले.










