काळा खडक, वाकड – पिंपरी चिंचवड या ठिकाणी SRA चा मातंग समाजातील दौलत नेटके यांच्या मालकीची जमीन लाटण्याचा प्रयत्न. लहुजी शासन पाठपुरावा करणार,
प्रतिनिधी – सोमनाथ खंडागळे दि – ०४ ऑगस्ट २६
मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे. केस चालू आहे. आणि जे मातंग समाजाचे पीडित आहे.दौलत नेटके त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुरेपूर न्याय मागण्याचा अधिकार आहे. तोपर्यंत SRA तुम्ही मानव अधिकार कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांच्या उंबरठ्यावर देखील जाऊ शकत नाही.त्यांच्याकडे सातबारा व सर्व डॉक्युमेंट जमीन लाटण्यासाठी जबरीने हमीपत्र SRA ज्यावेळी त्याचे घर पाडण्यासाठी आले होते त्या दिवशी ते माझ्याशी बोलताना सांगत होते बळजबरीने लिहून घेतले. नाहीतर घर पाडू अशा त्यांना धमक्या दिल्या. आणि बळजबरीने लिहून घेतल सही घेतली. हा हुकुमी राडा त्यांनी कोर्टापुढे सांगितलेला आहे. पुरावे दिलेले आहेत, व्हिडिओ निशी. या गोष्टीची पुरेपूर शहानिशा झाल्याशिवाय SRA आपण देखील हस्तक्षेप करू नये. आम्ही अजून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. जर काही अनुचित प्रकार घडला तर तुम्ही जबाबदार असाल कारण स्टॅम्प बिल्डरचा आणि रिसीव्ह sra ची असाही प्रकार पुराव्यानिशी आहे.124 मध्ये एस आर ए आहे. त्या ठिकाणी नोटीस येते, परंतु यांचा प्लॉट 125 क्रमांकामध्ये आहे. हा देखील त्यांच्याकडे पुरावा आहे. तरी हुकुमशाही वा..आपण कोणत्या अनुषंगाने कारवाई करताय हा माझा प्रश्न SRA ला व खडके साहेबांना आहे. पुण्यात असे किती प्रकार आहेत देवास ठाऊक, पुण्यातील कित्येक SRA प्रकल्पात किती घोटाळे आहे व भ्रष्टाचार आहे हे आम्हाला माहीत आहे. म्हणुन हायकोर्टात निकाल जो पर्यंत लागत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला तर मातंग समाज व लहुजी शासन ग्रुप शांत बसणार नाही सर्व समाज दौलत नेटके यांच्या पाठीशी उभा आहे हे लक्ष्यात घ्यावे. अन्यथा मानवाधिकार कायदे अंतर्गत आणि भारतीय दंड संहितेनुसार अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची सर्वसामान्य नागरिकांना परवानगी आहे. सत्य आहे आणि सत्याचा विजय होतो लक्ष्यात घ्या..
जय लहुजी ! जय शिवराय ! जय संविधान 🙏🚩
राष्ट्रप्रमुख लहुजी शासन ग्रुप मा. सनी भाऊ डाडर [ मा. सचिव पुणे शहर जिल्हा मातंग समज ]










