प्रियदर्शनी सेवाभावी संस्था संचलित शैक्षणिक संस्थांचा सुने चा मनमानी कारभार,
प्रतिनिधी – विलास पाटील ( हिंगोली )
हिंगोली जिल्ह्यातील माजी मंत्री स्वर्गीय रजनीताई सातव यांनी कळमनुरी मतदार संघामध्ये शैक्षणिक संस्था उभारून शैक्षणिक क्षेत्राची मतदार संघामध्ये यशस्वीरित्या जाळे पसरविले त्यांनी अपार कष्ट मेहनत जिद्दीच्या जोरावर बालवाडी पासून ते महा विद्यालया पर्यंत शैक्षणिक क्षेत्र उभारले, त्यानंतर माजी खासदार स्वर्गीय राजीवजी सातव यांनी ही सेवा अविरत चालू ठेवली पण काळाचा घाला राजीव सातव आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती आमदार डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना दमदाठी करून काही कर्मचाऱ्यांना बंगल्यावर घरघडी तर काहींना साई गॅस एजन्सी येथे कामावर ठेवून त्यांचा पगार मात्र शासनाच्या तिजोरीतूनच होतो आहे तसेच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून एक लाख ते दहा लाख रुपयांची मागणीही केल्या जाते ती पूर्ण नाही केल्यास त्यांचा प्रस्ताव हा शिक्षण अधिकाऱ्याकडे न पाठवण्याचा अलिखित आदेश देऊन मुख्याध्यापकांना वेठीस धरल्या जाते, हा पैसा आणायचा कुठून म्हणून काही कर्मचारी स्वतःच्या कुटुंबासह आत्महत्या करण्या च्याही तयारीत असल्याचे बोलले जात आहे, तालुक्यातील जवळा पांचाळ येथील कैलासवासी शंकरराव सातव विद्यालयामध्ये पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग असून आठवी ते बारावी वर्गातील मुलींसाठी शौचालय असून नसल्यासारखे आहे लघुशंकेसाठी बाजूच्या शेतामध्ये जाऊन वापर करावा लागतो, शाळेच्या स्वच्छालय मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसते आहे तथाकथा तिथ अध्यक्षा नसलेल्या आमदार प्रज्ञा सातव व मुख्याध्यापक यांच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे स्वर्गीय राजीव सातव हे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या घरातील सदस्य समजूनच त्यांच्याशी वागत आहेत आज प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू दिसत आहेत जर आमचे राजू भाऊ, रजनीताई सातव हे असते तर आमच्यावर अशी वेळ कधीच आली नसती असे प्रत्येक कर्मचारी बोलत आहेत










