लऊळ येथे प्रयास फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न 94 रक्तदात्यांनी केले रक्तदान…
दिनेश शिंदे/ लऊळ प्रतिनिधी
लऊळ ता. माढा येथे प्रयास फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष बापुराव नलवडे यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या मध्ये 94 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून प्रयास फाऊंडेशन च्या वतीने अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात या मध्येच ग्रामदैवत जागृत देवस्थान जगदंबा मंदिर येथे रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मध्ये प्रथमतः आई जगदंबा देवीला नारळ वाढवून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे बाळासाहेब पाटील , साम्राज्य आरमार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश काका पाटील ,ॲड हरिश्चंद्र कांबळे, सौ प्रियंका नलवडे, स्वाती लोकरे,सारिका नलवडे,तेजश्री नलवडे,सिद्धेश्वर पाटील , दीपक गिड्डे, उद्योजक प्रशांत नलवडे, चेअरमन विजू काका नलवडे, पोलिस पाटील चंद्रकांत लोकरे,भाऊ नाना नलवडे,औदुंबर पाटील ,नारायण बापू नलवडे, ग्रामपंचायत सदस्य देविदास गांधले, विलास नलवडे, पोलिस अमोल लोकरे,माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी गरड , गणेश घुगे , संकेत काका पाठक,अमोल नलवडे, संतोष गवळी ,पत्रकार वसंत कांबळे, पत्रकार दिनेश शिंदे,पत्रकार कालिदास जानराव , माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश जानराव ,विकास गाडे, दाजी लोकरे ,भारत मोरे,ओंकार नलवडे, रामराजे नलवडे,प्रसिद्ध निवेदक खंडू लोकरे , शिवानंद दीक्षित, पैलवाण गोविंद नलवडे, रमेश चोपडे, बप्पा लोकरे, बाबा लोकरे,देवा लोकरे, , दत्ता बागल, विश्वास गायकवाड, धनंजय नलवडे, ऋषीकेश गायकवाड, नवा लोकरे, पंकज चव्हाण, सुदीप कदम,अशोक पाटील , सर्जेराव डिकोळे ,परमेश्वर कोकाटे, प्रवीण लोकरे, सुधीर मांजरे, हनुमंत देवकर,बाजीराव नलवडे, शंकर कदम,रामेश्वर डीकोळे,गोठू पाटील , प्रशांत जगताप, शंकर नागने, सागर कोळी ,नंदू लोकरे, सचिन गोसावी , बंडू मुलाणी, बालाजी नलवडे, बबलू डिकोळे, गणेश जाधव, रफिक बागवान, संतोष कांबळे,नाना धडे, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










