छावा मराठा सेनेचा मातंग समाज व इतर तत्सम पोटजातींच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी 18 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड मध्ये होणाऱ्या मोर्चाला जाहीर पाठिंबा:- सचिन लिमकर प्रदेशाध्यक्ष- छावा मराठा सेना
दिनांक:10 ऑगस्ट 2026 पिंपरी-चिंचवड चंद्रकांत उदगिरे
मातंग समाज व अनुसूचित जातीतील इतर तत्सम पोटजाती गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. आरक्षणाचा लाभ केवळ काही विशिष्ट जातींपर्यंत मर्यादित राहिल्याने खऱ्या गरजू समाज घटकांपर्यंत तो पोहोचलेला नाही. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण तात्काळ लागू करणे ही काळाची गरज आहे. यामुळे मातंग, कैकाडी, मांग गारूडी, रामोशी,भिल्ल,पारदी,डकलवार व इतर आदी पोटजातींना न्याय मिळेल आणि त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.या मागणीसाठी दि. 18 ऑगस्ट 2026, सोमवार रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. छावा मराठा सेना या मोर्चाला जाहीर व सक्रिय पाठिंबा देत आहे. सामाजिक समता आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या लढ्यात खांद्याला खांदा लावून सहभागी होणार आहोत.शासनाने राजकारण बाजूला ठेवून तातडीने उपवर्गीकरणाचा निर्णय लागू करावा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आम्ही देत आहोत.तरी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मातंग बांधव, इतर मागास पोटजातीचे नागरिक, सामाजिक संघटना व सर्व पुरोगामी नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन छावा मराठा सेना च्या वतीने करण्यात येत आहे.यावेळी छावा मराठा सेना प्रदेशाध्यक्ष सचिन आण्णा लिमकर, प्रदेश सचिव सचिन भाऊ भिसे, सल्लागार तथा शिवशाही व्यापारी संघ प्रदेश वरीष्ठ उपाध्यक्ष अनंत काका कुलकर्णी,पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल धस, कार्याध्यक्ष विक्रम पाटील, धनंगर समाज बांधवांचे नेते विशाल शेंंडगे,सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले, अरूण जोगदंड,संजय ससाणे, स्वप्निल अण्णा जाधव ,शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे, हनुमंत उर्फ नाना कसबे, गणेश अवघडे,प्रसाद केसरे,देवा कसबे, अविनाश कांबळे, शिवशाही महीला आघाडी प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, शिवशाही तृतीयपंथी भगिनी आघाडी प्रदेश अध्यक्षा अर्चना शिंदे, सरीना राजगुरू,शिवशाही महीला आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा अनिता वैरागळ, शिवशाही माथाडी कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष सचिन दोनगहू, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गौतम गायकवाड, शिवशाही अल्पसंख्याक आघाडी प्रदेश अध्यक्ष हर्षद भाई खान,जेष्ठ नेते नामदेवराव रिट्टे आदी शेकडो पदाधिकारी व हजारो समाज बांधव उपस्थित होते. मोर्चाचा मार्ग: आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक चिंचवड स्टेशन ते निगडी अपरतहसिलदार कार्यालय वेळ: सकाळी 10:00 वा.आपला सचिन आण्णा लिमकर प्रदेशाध्यक्ष छावा मराठा सेना पिंपरी-चिंचवड शहर संपर्क:+91 86009 60027










