कारेपूर येथे ८० वा स्वातंतर्य दिन उत्साहात साजराकारेपूर : कारेपूर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
बोल महाराष्ट्र न्यूज लातूर जिल्हा प्रतिनिधी – सतीश माने
महात्मा गांधी चौकातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य चांदभार्ड शेख यांच्या हस्ते संपन्न झाला,तसेच जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण सरपंच प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेस्वातंत्र्य दिनानिमित्त गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीते, भाषणेव विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेयावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला










