पुणे शहर जिल्हा मातंग समाज व साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टरांना भाऊ साठे स्मारक जयंती महोत्सव 2026 27 या वर्षासाठी स्वागताध्यक्षपदी श्री अनिल दादा हातागळे यांची निवड झाली व सचिव पदासाठी श्री ॲड महेश सकट यांची निवड झाली.
पुणे शहर प्रतिनिधी – सोमनाथ खंडागळे दिनांक 13 जुलै 2026,
काल दिनांक १२ जुलै रोजी पुणे या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जयंती महोत्सवासाठी व वर्षभर समाजाच्या कार्यासाठी स्वागत अध्यक्ष व सचिव यांची निवड प्रक्रिया मतदान करून करण्यात येते याही वर्षी ती मोठ्या दिमाखात आनंदात संपन्न झाली या वेळी सचिव पदासाठी 24 उमेदवार तर स्वागत अध्यक्ष पदासाठी आठ उमेदवार इच्छुक होते यामध्ये पूर्ण वर्षभरासाठी निवड प्रक्रिया संपन्न झाली स्वागत अध्यक्ष पदी श्री अनिल दादा हातागळे यांची निवड झाली तर सचिव पदासाठी एडवोकेट महेश सकट यांची निवड झाली यावेळी मातंग समाजातील कोर कमिटी मधील सर्व सदस्य उपस्थित होते यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया संपन्न झाली आणि यावर्षी नवनिर्वाचित स्वागताध्यक्ष व सचिव निवडण्यात आले सर्व मातंग बांधवांच्या वतीने यांना यावेळी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










