लोहकांत एक विचारधारा समाजाकरिता चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे पावसाचे अधिवेशनात लोहार समाजाच्या विविध मागण्यासाठी लक्षवेधी..आंदोलन
बोल महाराष्ट्र न्यूचे सह,संपादक श्री रामलिंग किसन कांबळे यांची सविस्तर माहिती.
लोहार समाजाच्या विकासासाठी साखळी उपोषण महाराष्ट्रातील लोहार समाज हा पुर्वी पासुन पारंपारिक लोहार काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात पण हल्लीच्या युगात पारंपारिक लोहार काम बंद पङले मग समाजापुढे कुटूबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसे करायचे, याचा प्रश्न निर्माण झाला आहे, शासनाकडून लोहार समाजाला 75 वर्षात शिक्षण क्षेत्रात समाजिक राजकीय अधिक क्षेत्रात कुठेही म्हणावे असा लाभ मिळत नाही म्हणून समाजाचे प्रश्न शासनाले समजले पाहिजे, यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात लोहार समाजाच्या मागण्यांबाबत आझाद मैदान मुंबई येथे 29 /6 /20 26 रोजी, उपोषणास करण्यात येणार आहे.
उपोषणकर्त्यांची नावे : माननीय ज्ञानेश्वर लोहार साहेब, माननीय गणेश भालके साहेब, माननीय रामलिंग कांबळे साहेब, माननीय शिवाजी दवणे साहेब, माननीय प्रभाकर लाड साहेब, माननीय अनिल लोहार साहेब, लोहार समाजातील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलनाला उपस्थित राहावे ही विनंती










