प्रतिनिधी- गणेश भालके
📌देवळाली प्रवरा येथे जागतिक एकल महिला दिन साजरा..!📌 राहुरी तालुका वात्सल्य समितीचे सदस्य आप्पासाहेब ढूस यांच्याकडून एकल महिलांना मार्गदर्शन. देवळाली प्रवरा – २३ जून देवळाली प्रवरा च्या प्रसादनगर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगणात राहुरी तालुका वात्सल्य समिती, तसेच साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र आणि महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक एकल महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुरी तालुका वात्सल्य समितीचे सदस्य आप्पासाहेब ढूस यांच्याकडून एकल महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. व उपस्थित एकल महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रसंगी राहुरी तालुका वात्सल्य समितीचे सदस्य तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांच्यासह, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, पत्रकार आशिष संसारे, प्रभाकर कांबळे, रजनीताई कांबळे गणेश, भालके समीर शेख, आरोग्य सेविका सीमा निकलोस अल्हाट, अंगणवाडी सेविका ज्योती प्रमोद जोशी, रेहाना शाकीर शेख, अर्चना राहुल भालेकर, सविता संदीप कदम, शिक्षक खंडागळे सर व शिंदे सर, आदींसह देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी हद्दीतील एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एकल महिला दिन (जागतिक विधवा दिवस) म्हणून साजरा व्हावा म्हणून महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी काढलेल्या आदेशानुसार व हेरंब कुलकर्णी, राज्य निमंत्रक, साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा जोतिराव फुले यांना त्यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त एकल महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रसंगी क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या विधवा महिलाविषयी केलेल्या कामाची माहिती देताना आप्पासाहेब ढूस म्हणाले की, त्या काळात अगदी पाळण्यात असताना मुलींचे विवाह होत. अनेकदा साथीच्या आजारात मोठ्या प्रमाणावर मृत्यू व्हायचे आणि पाळण्यातली लहान मुलगी विधवा व्हायची. तिचे पुन्हा नंतर कधीही लग्न होत नसे. त्यामुळे आयुष्यभर ती विधवा म्हणून जगायची. आज हे हास्यास्पद वाटेल पण तसेच वास्तव होते. ज्या नवऱ्याला कधी बघितलेही नाही. त्याच्या नावाने आयुष्यभर जगावे लागे. विधवा स्त्रीने लाल रंगाचे पातळ घालायचे. दर महिन्याला डोक्यावरचे केस कापायचे आणि घरातील एका अंधाऱ्या खोलीत आयुष्यभर राहायचे इतके वाईट जीवन विधवांना त्या काळात जगावे लागत होते.. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी यात लक्ष घातले. विधवा पुनर्विवाह हा त्यावरील उपाय होता. तोच वारसा पुढे चालविण्यासाठी समिती तसेच राज्याची महिला व बालविकास विभाग यांच्या सहकार्याने आम्ही प्रयत्न करत आहोत.. स्थानिक एकल भगिनींनी एकत्र येऊन त्यासाठी गट स्थापना करून त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत राज्य शासन व सावेकर महिला समिती त्यांना मदत करायला केव्हाही तयार आहोत असे ढूस यांनी शेवटी सांगितले. प्रास्ताविक पत्रकार शिवाजी घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश भालके यांनी केले.










