बोरगाव मंजूजवळ भीषण रस्ता अपघात, 2 ठार, 6 गंभीर जखमी
अकोला – 14 मे
रात्री सुमारे 11:30 वाजता बोरगाव मंजूजवळ एका भीषण रस्ता अपघात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण गंभीर जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगावचा कुरेशी परिवार रिसेप्शनवरून परत आपल्या गावी वाडेगावला जात होता. महामार्गाच्या मध्यभागी *RJ 30 GB1001* क्रमांकाचा कंटेनर डिझेल संपल्यामुळे कोणताही इंडिकेटर न लावता उभा होता. त्याचवेळी कुरेशी परिवाराची ECO गाडी येऊन त्याला धडकली.या अपघात 7 वर्षांचा चिमुकला *शेख अर्शियान शेख इरशाद* आणि 65 वर्षीय *अब्दुल कुदुस शेख बिराम* यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये 4 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.घटनेनंतर बोरगाव मंजूच्या मुस्लिम समाजातील काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप आहे की सरकारी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. वेळेवर मदत न मिळाल्यामुळे दोन जणांनी जागीच प्राण गमावले.नंतर काही नागरिकांनी गाड्या थांबवून जखमींना खासगी वाहनांमधून उपचारासाठी अकोल्याला हलवले.घटनेनंतर वाडेगावमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.*न्यूज रिपोर्टर: फिरोज कुरेशी*










