टेंभुर्णी करमाळा महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे ….संपादित जमिनीचा पालखी मार्गाप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. संभाजी पाटील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
बेंबळे प्रतिनिधी :
टेंभुर्णी करमाळा या 45 किलोमीटर रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून अतिशय धिम गतीने चालू आहे काही ठिकाणी रस्ता पूर्ण ऊखडून गेला आहे .या रस्त्यावरून नाशिक नगर शिर्डी धुळे जळगाव मध्य प्रदेश या भागातून येणाऱ्या तसेच कोल्हापूर सातारा सांगली पंढरपूर या भागातून नगर नाशिक मध्यप्रदेश कडे जाणाऱ्या वाहनांची सतत अहोरात्र रहदारी चालू असते. अनेक वर्षापासून या रस्त्याला इंदूर – बेंगलोर रस्ता व दक्षिण उत्तर भारताला जोडणारा रस्ता म्हणून देखील ओळखला जाते. या रस्त्याचे काम पूर्वीच मंजूर होऊन चालू झाले आहे परंतु आता रखडले असल्यामुळे हे काम तातडीने व्हावे, अपघात होऊ नयेत व दळणवळण सोयीचे व्हावे तसेच या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या बागायती जमिनीसाठी महामार्ग व पालखी मार्ग प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचे निवेदन माढा तालुका अकोले खुर्द पंचायत समितीचे सदस्य संभाजी उर्फ गोटू पाटील कारखान्याचे संचालक दीपक पाटील सरपंच कांतीलाल नवले व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले ,या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.. वृत्तांत असा की टेंभुर्णी करमाळा रोड वरती रात्रंदिवस फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालू असते ,जड मालवाहू वाहने तसेच जिप्स मोटरसायकल्स व साखर कारखाने सुरू झाल्यानंतर उसाच्या वाहनांची सतत रहदारी चालू असते. रस्ता मंजूर होऊन त्याचे काम सुरू होऊन अनेक वर्ष झालेत परंतु हे काम रखडले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे मोठे अपघात घडत आहेत,व दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय निरुपयोगी व धोकादायक �










