प्रतिनिधी पुणे-
पुणे शहरांमध्ये जनता वसाहत येथेही घडलेली घटना जय भवानीनगर सारसबाग आणि स्वारगेट चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र युवा सेनेची रणरागिनी वाघीण सौ. दिपालीताई कांबळे महिला अध्यक्ष महाराष्ट्र युवा सेना यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या चिमुकल्या लेकराला न्याय मिळावा म्हणुन कॅनल मध्ये जीव देण्याचा प्रयत्न केला.कारण त्या चिमुकलीवर जो अन्याय अत्याचार झाला त्याला वाचा फुटावी याकरिता महाराष्ट्र युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहून पोलीस प्रशासनाच्या समोर जाऊन कायदा हातात घेऊन प्रशासनाला जाब विचारण्यात आला. आरोपीला आमच्या स्वाधीन करावे किंवा त्याला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. म्हणुन पोलीस प्रशासनाने सकाळी दहा वाजता जनता वसाहत चौकी येथे शांततेत येऊन आपल्याला जे काही आरोपीबद्दल विचारणा करायचे आहे त्यांनी सर्वांनी तिथं उपस्थित राहून आम्ही आपणास सहकार्य करतो म्हणून पोलीस प्रशासनाने दहा वाजता पोलीस चौकी येथे उपस्थित राहण्यात सांगण्यात आले.
महाराष्ट्र युवा सेना यात सक्रिय असून सर्व पदाधिकारी उपस्थित राहून आरोपीला शिक्षा होईपर्यंत ठाम राहून विचारणा केल्याशिवाय माघार घेणार नाही असे कार्यकर्ते म्हणाले..










