लऊळ तालुका माढा येथील श्री संत कूर्मदास हॉस्पिटल यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न …..(शिबिराच्या माध्यमातून यापूर्वी 500 रुग्णाची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी )
दिनेश शिंदे/सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
लऊळ ता . माढा येथील श्री संत कूर्मदास हॉस्पिटल येथे मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी या शिबिराचे उद्घाटन श्री संत कूर्मदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्हा माजी समाज कल्याण सभापती शिवाजी नाना कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले व कार्यक्रमास सुरवात करण्यात आली यावेळी सरपंच पवन भोंग,माजी उपसरपंच संजय बापू लोकरे , माजी सरपंच दिनेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य खंडू भोंग, माजी सरपंच शिवाजी आप्पा भोंग ,स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे, पत्रकार दिनेश शिंदे,सुभाष नाना लोकरे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर नलवडे,डॉ घाडगे, डॉ चव्हाण, डॉ मकरध्वज क्षीरसागर, डॉ आरती मकरध्वज क्षीरसागर,ग्रामसखी वंदना ओहोळ, आदी पदाधिकारी उपस्थित होते …










