नसरापूर घटनेतील आरोपी व पर्वती घटनेतील आरोपी यांना फाशीची शिक्षा द्या. लहुजी शासन ग्रुप संस्थापक सनीभाऊ डाडर यांची मागणी.
प्रतिनिधी पुणे जिल्हा- दत्तात्रय ढवळे
नसरापूर घटना ताजी असतानाच पर्वतीच्या पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय चाललंय पुण्यामध्ये लहान लहान चिमुकल्या पुण्यात सुरक्षित नाही तसेच वाटतं त्यासाठी सरकारने योग्य ते पाऊल उचलला पाहिजे कारण
नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (१ मे) उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले आहे.
या प्रकरणात ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध खून, बलात्कार आणि ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. आरोपीला विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी पाच मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खरं आहे परंतु अशा नराधमांची तात्काळ विल्हेवाट लावावी अन्यथा लहुजी शासन ग्रुप गप्प बसणार नाही
या दोन्ही क्रूर अशा घटना होण्यासारख्या सांस्कृतिक ठिकाणी काळीमा असणाऱ्या घटना घडल्या आहेत याचा निषेध करून या नराधमांना फाशीची शिक्षा द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या. जेणेकरून चिमुकलींवर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार थांबवायचे असेल तर अशा नरधवांचा क्रूर अंत व्हावा असे आवाहन सरकारला लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सनी भाऊ दादर यांच्या वतीने माध्यमांशी बोलताना करण्यात आले










