प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे पुणे.
*लहुजी शासन ग्रुपच्या* वतीने अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे म्हणून समाज कल्याण आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लहुजी शासन ग्रुप संस्थापक अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा मातंग समाज माजी सचिव,व बोल महाराष्ट्र माध्यम समूह संपादक – मा.सनी भाऊ डाडर तसेच राष्ट्रीय अध्यक्ष – मोहन दादा वाघमारे, पुणे शहर अध्यक्ष – चंद्रकांत आढागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष – अविनाश बोरडे, पुणे शहर सचिव – विनायक भिसे, आदरणीय ताई, शिवाजीनगर मतदारसंघ उपाध्यक्ष – उमेश नाडे, इत्यादी उपस्थित होते. तसेच संस्थापक अध्यक्ष यांनी समाज कल्याण आयुक्त यांना विनंती केली की, अनुसूचित जातींमध्ये आरक्षण उप-वर्गीकरणास लहुजी शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा दिला आहे म्हणून मातंग समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि मागास राहिलेल्या जातींना आरक्षणाचा पुरेपूर उपभोग मिळावा म्हणून 59 जातीमध्ये समतोल राखून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यात उपवर्गीकरण करून न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली. आज लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्यांच्या वतीने पुणे, नांदेड, अहिल्यानगर, लातूर या ठिकाणी निवेदन देण्यात आली.. 🙏🔊










