कार्यकारी संपादक
सागर लोहार
9881515725
महाराष्ट्र राज्यातील काना-कोपऱ्यातील विविध संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून लोहार समाजाच्या व्यथा, मागण्या राज्य शासनासमोर एकजुटीने मांडण्याच्या उद्देशाने स्थापन होणाऱ्या “राज्यस्तरीय लोहार समाज संघटना समन्वय समिती (महाराष्ट्र राज्य)” यांची पहिली बैठक शेगाव जि. बुलढाणा याठिकाणी पार पडल्यानंतर, याच शृंखलेतील दुसरी बैठक ही शनिवार, दि. 18 एप्रिल 2026 रोजी, श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळा, आळंदी, पुणे येथे अतिशय उस्ताहाच्या वातावरणात पार पडली.
या बैठकीदरम्यान लोहार समाजाच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्यांचा पाठपुरवठा, लोहार समाज सर्व्हेक्षण, आरक्षणा संबंधी लढा, समन्वय समितीचे गठण यासारख्या विविध विषयांवर चर्चा व निर्णय झाले.
या सभेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 31 सक्रिय संघटनांनी सहभाग नोंदवला. “या समन्वय समितीला आजपर्यंत 50 पेक्षा जास्त संघटनांचा सक्रिय पाठिंबा आणि सहभाग लाभला आहे. “
महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या सर्व लोहार समाज संघटनांनी या समन्वय समिती मधे सहभाग नोंदवून आपला जाहीर पाठिंबा द्यावा व या ऐतिहासिक समाज चळवळीचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले.
आळंदी बैठकीला उपस्थित संघटना :-
• लोहार समाज अभ्यास गट (विविध तज्ञ मंडळी)
• वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ (नागपूर)
• कोकण विभागीय लोहार समाजसंघ (कोंकण)
• लोहार युथ फाऊंडेशन (LYF)
• अखिल लोहार समाज विकास संघ, महाराष्ट्र राज्य
• श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळा, आळंदी देवाची, पुणे
• कोल्हापूर जिल्हा लोहार – गाडीलोहार युवा मंच
• महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ, गडचिरोली
• राज्य लोहार गाडी लोहार समाज संघटना, (सातारा)
• लोहार विकास संस्था (महाराष्ट्र राज्य)
• श्री विश्वकर्मा लोहार विकास संस्था, टाकळी (सोलापूर)
• प्रभू श्री विश्वकर्मा लोहार समाज शिक्षण संस्था, चंद्रपूर
• नाशिक जिल्हा लोहार समाज विकास संघ नाशिक
• गाडीलोहार समाज संघटना, ज्ञानेश्वर नगर (नागपूर)
• लोहार समाज मित्रमंडळ, पिंपरी चिंचवड (पुणे)
• हिंदू लोहार समाज, पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ
• लोहार समाज बहुउद्देशीय संस्था, भोसरी (पुणे)
• अहिल्यानगर जिल्हा लोहार समाज सामाजिक प्रतिष्ठाण
• लोहार समाज जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर
• लोहार समाज संस्था (वर्धा)
• युथ विश्वकर्मा लोहार संघटना बुटीबोरी, नागपूर
• श्री विश्वकर्मा वंशी सेना, छत्रपती संभाजीनगर
• सोलापूर लोहार समाज संघटना, सोलापूर
• खांदेश गाडी लोहार समाज मंडळ, पुणे
• श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय युवा मंच (धुळे)
• लोहार विकास परिषद, वर्धा
• समस्त लोहार समाज संघटना, भोसरी (पुणे)
• महाराष्ट्र विश्वकर्मामय समाज बहूउद्देशीय संस्था, वर्धा
• जगत ब्रम्ह प्रभू विश्वकर्माधाम बहुउद्देशिय शिक्षण व सा.संस्था, शेगांव
• पितांबर मुऱ्हाजी रूम स्मृती प्रतिष्ठाण, मोताळा
• लोहार समाज एकत्रिकरण मंडळ, शेवगाव

















