प्रतिनिधी- रामलिंग कांबळे सोलापूर दिनांक- 17 एप्रिल 2026
पिंपळनेर येथे सौर पंपाच्या प्लेट्सना माकडांचा फटका; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
माढा तालुक्यातील पिंपळनेर (जि. सोलापूर) येथे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपाच्या प्लेट्सना माकडांनी नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.पिंपळनेर येथील शेतकरी श्री. राजेंद्र रघुनाथ भोगे यांच्या गट क्रमांक 178 मधील शेतात शासनाच्या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा पंप बसवण्यात आला होता. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (PM Kusum-B) अंतर्गत हा पंप बसवण्यात आला असून, संबंधित कंपनीमार्फत (SRIPVR LTB) त्याची उभारणी करण्यात आली होती.मात्र, अलीकडेच शेतात माकडांच्या धुमाकुळामुळे सौर पॅनेलच्या प्लेट्स चहुबाजूंनी क्रॅक झाल्या आहेत. यामुळे पंपाची कार्यक्षमता पूर्णपणे बाधित झाली असून, शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे.या घटनेमुळे शेतकरी भोगे यांचे मोठे नुकसान झाले असून, संबंधित सौर कंपनीने तातडीने याची दखल घेऊन खराब झालेल्या प्लेट्स बदलाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली जात











