प्रतिनिधी- फिरोज कुरेशी
शीर्षक: अचलपूर-परतवाडा येथील गंभीर प्रकरण: आरोपीवर POCSO अंतर्गत कारवाईची मागणी, महिला संघटनांचे पोलीस ठाण्यात निवेदन
अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी
दिनांक: १५ एप्रिल २०२६ | स्थळ: परतवाडा, जिल्हा अमरावती
अचलपूर-परतवाडा परिसरात अल्पवयीन व तरुण मुलींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण व ब्लॅकमेल केल्याच्या धक्कादायक आरोपांमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा केला जात असून, आरोपी मोहम्मद अयान मोहम्मद तनवीर याच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी: मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मोठ्या संख्येने तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे. तसेच 350 पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. पोलीस व सायबर सेल या सर्व आरोपांची व व्हिडिओंच्या सत्यतेची पडताळणी करत आहे.










