मौजे सावरगाव माळ ता.हादगाव जिल्हा नांदेड येथे आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक आदिवासी दिन क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून साजरा करण्यात आला व गुणगौरव करण्यात आले
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ राजू सूर्यवंशी
.त्यानिमित्ताने गावातील कु. स्वाती धोंडबा गारोळे नीट एमबीबीएस पात्र ,राजू रामाजी पोत्रे महाराष्ट्र पोलीस मुंबई ,नारायण लिंबाजी ढोले आरोग्य सेवक जालना ,अमोल उमाजी गारोळे महाराष्ट्र पोलीस जालना , कु संजीवनी चंद्रकांत मुरमुरे एअरपोर्ट संभाजीनगर येथे लागल्यामुळे सर्वांचे व सर्व मुलांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील पोलीस पाटील कचरू गारोळे,सरपंच पादरे ,तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव डवरे,तंटामुक्ती उपाध्यक्ष मनोहर नामदेव मुरमुरे, जीवन गारोळे सर ,मारुती गारोळे ग्रामपंचायत अधिकारी, शंकर मेटकर ,मारोतराव ढोले, ब्रह्माजी बोडके व गावातील पुरुष मंडळी उपस्थित होती










