प्रतिनिधी- रामलिंग कांबळे
अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ ,सातारा प्रणित लोहार शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य
गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ सन 2026 – 27
अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ सातारा प्रणित लोहार शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ सन 2020 -27. हा कार्यक्रम माननीय
श्री संतोषजी हराळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साह पूर्व आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला
या कार्यक्रमात समाजातील तरुण-उंदा होतकरू आणि तरुणांच्या गळ्यातील ताई म्हणून ओळखले जाणारे .
मा. श्री लक्ष्मणराव पखाले साहेब यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व कठोर परिश्रम शिस्त आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले
शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने त्यांनी काही गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु 2000 आर्थिक मदत जाहीर केली व देण्यात आली तसेच एका गरजू विद्यार्थिनीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्चही उचलण्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा आणि बळ मिळणार आहे
शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा त्यांचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता आणि सेवाभावी वृत्ती ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी केलेला या समाज हिताच्या कार्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे
माननीय श्री लक्ष्मणराव पखाले साहेब यांना त्यांच्या या समाजाच्या आणि शैक्षणिक कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व आभार त्यांनी समाजसेवेचा हा वसा असाच अखंडपणे पुढे चालू ठेवावा आणि समाजातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची उभारी मिळावी ही सदिच्छा










