दिनेश शिंदे / लऊळ प्रतिनिधी उजनी मा .
ता .माढा येथील शेतकऱ्यांचे गेल्या 4 महिन्यापासून जवळपास लाईट अभावी मोठे नुकसान होत असून लाईट वारंवार ट्रिप व घोटाळा या नावाखाली लाईट जात असून जनावरांना पिण्यासाठी पाण्याचे हाल होत असून याचबरोबरोबर 25 एम्पेयर चा सिंगल फेज साठी नियम दाखवला जातो तर एका फिडरवर 30 ते 35 डीपी आवश्यक आहेत त्या ठिकाणी 60 ते 70 डिपी एका फिडरवर आहेत तसेच वाड्यावस्त्यांवती 60 ते 70 घरगुती मीटर कनेक्शन आहेत तरीदेखील लाइट चा अभाव दिसून येत आहे तसेच संध्याकाळी लाईट नसल्याने डाळिंब , केळी यांसाख्या पिकांची रातोरात चोरी होत असल्याचे दिसत आहे तरी रात्रीची लाईट सुरळीत करावी व होणारे शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून झालेली दिसत आहे ….*** दिवसाची थ्री फेज लाइट 4 तास 40 मिनिट असताना देखील दीड तास लाईट मिळते बाकी लाईट घोटाळा व ट्रिपिंग वर टाइम घालवला जातो या संदर्भात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात 4 महिन्यापासून सिंगल फेज रात्रीची लाईट 18 तास नसते त्यामुळे डाळींब बाग चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यातच रातभर ड्रॉन कॅमेरे फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी तत्काळ योग्य ती कार्यवाही करून रात्रीची सिंगल फेज लाईट सोडण्यात यावी …….( अविनाश निकम उजनी माजी सरपंच )










