श्रीगोंदा प्रतिनिधी:- राजाभाऊ जगताप 9970942040
अहिल्यानगर शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. आपल्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यासंदर्भात नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.
तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत इंधनाच्या साठ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि मागील महिन्याशी त्याची तुलनात्मक पडताळणी केली जात आहे.
नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर (मिसकम्युनिकेशन) किंवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये.
जिल्हा प्रशासन आणि पेट्रोलियम एजन्सीज परिस्थितीचे सातत्याने मॉनिटरिंग करत आहेत, त्यामुळे पॅनिक होण्याची कोणतीही गरज नाही… जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया [अहिल्यानगर]
अचूक आणि अधिकृत माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा !
अहिल्यानगर #पेट्रोलडिझेल #जिल्हाधिकारीआवाहन #अफवांवरविश्वासठेवूनका #इंधनसाठा #अहिल्यानगरप्रशासन #माहितीकार्यालय #महाराष्ट्र_बातम्या #Ahilyanagar #NoPanic







![मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य [ Human Right Council ]](https://bolmaharashtranews.online/wp-content/uploads/2026/04/547538-1-190x122.jpg)

