बारामती (प्रतिनिधी) राजाभाऊ जगताप 9970942040
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडित महिला “निर्भया” हिला न्याय मिळवून देण्यात पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याने पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
सदर प्रकरणात आरोपी आण्णा सुरेश ओव्हाळ (वय 43, रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा) याने दिनांक 14 जून 2024 रोजी पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. पीडित महिलेने धैर्य दाखवत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजि. नं. 453/2024 भा.द.वि. कलम 376 (2) (r) अन्वये तत्काळ नोंद करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक संध्याराणी देशमुख यांनी अत्यंत काटेकोरपणे केला. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक पुरावे यांचे सक्षम संकलन करून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले.
सदर खटल्याची सुनावणी बी. डी. शेळके (जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बारामती) यांच्या न्यायालयात (सेशन केस क्र. 163/2024) झाली.
न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत भा.द.वि. कलम 376(2) (F) अंतर्गत 10 वर्षे सश्रम कारावास व ₹20 हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता कमलाकर एस. नवले यांनी प्रभावी युक्तिवाद करत सरकारची बाजू भक्कमपणे मांडली.
ही कारवाई संदीप सिंह गिल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक), सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी) आणि श्रीशैल चिवडशेट्टी (प्रभारी पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
तसेच सेशन कोर्ट पैरवी अंमलदार कसपटे, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी घोळवे (पुणे ग्रामीण) तसेच कोर्ट कर्मचारी म.पो.शि. आवटे व म.पो. हवा कोकरे यांचा या कामगिरीत मोलाचा सहभाग राहिला.
या निकालामुळे महिलांवरील अत्याचारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धार अधोरेखित झाला आहे.
“महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही; गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईलच,” असा ठाम संदेश बारामती पोलिसांनी दिला आहे.






![मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य [ Human Right Council ]](https://bolmaharashtranews.online/wp-content/uploads/2026/04/547538-1-190x122.jpg)

