

प्रतिनिधी पुणे: दिनांक ०८ एप्रिल २०२६ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.या प्रकरणातील आरोपींमध्ये सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (वय ५२), कनिष्ठ सहायक अनिल पोपट रंधवे (वय ३२) आणि आतिश कैरू शिंदे (वय ४०) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत वानवडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.तक्रारदार शिक्षण सेवकाने उपशिक्षक पदासाठी पदोन्नतीचा प्रस्ताव पंचायत समिती वेल्हे येथून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सादर केला होता. त्यानंतर सहायक प्रशासन अधिकारी खंदारे यांची भेट घेतली असता, जातवैधता प्रमाणपत्र नसतानाही प्रस्ताव अनुकूल पाठविण्याचे आश्वासन देत त्यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, आरोपींनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर उर्वरित पावणेतीन लाख रुपये स्वीकारण्यासाठी तक्रारदाराला ( Birbe Case) घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका मॉलसमोर बोलावण्यात आले.सोमवारी (६ एप्रिल) एसीबीने सापळा लावून रंधवे आणि शिंदे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर मुख्य आरोपी खंदारे यालाही ताब्यात घेण्यात आले.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक आयुक्त नीता मिसाळ ( Birbe Case) करत आहेत.
#लाचलुचपत #pune #Maharashtra #news @bolmaharashtranews









![मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य [ Human Right Council ]](https://bolmaharashtranews.online/wp-content/uploads/2026/04/547538-1-190x122.jpg)

