दिनांक 24 जुलै 2026 रोजी बोल महाराष्ट्र न्यूज लातूर जिल्हा प्रतिनिधी : सतीश माने
आदर्श विद्यालय, कारेपूर येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश (ड्रेस) व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम समाजसेवक श्री. धनंजय माने यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास कारेपूर गावचे सरपंच श्री. प्रवीण माने, सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. श्रीपतराव माने, ॲड. तानाजी कणसे, ग्रामपंचायत सदस्य व माधव साळवे, श्रीरंग गुळबीले, पितांबर सावरे, शाहजी गुळबीले , तानाजी कापसे ,ग्रामस्थ, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला मोलाची मदत करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी श्री. धनंजय माने यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.









