✍️ अरुण गुजर | प्रतिनिधी, अकलूज | बोल महाराष्ट्र न्यूज
लोहार समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास प्रारंभमुंबई, दि. २९ जून : लोहार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास उत्साहात प्रारंभ झाला. उपोषणाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करून आंदोलनाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी श्री संजयजी कोळंबेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली लोहार समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी श्री शिवाजीराव कळसे, श्री दिलीपजी वसव, श्री अण्णासाहेब जोशी, श्री रामलिंगजी कांबळे, श्री गणेश भालके (सामाजिक कार्यकर्ते) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी अशोकराव पुंडलिकराव कोहळे (जिल्हाध्यक्ष, वाशिम – लोहार समाजसेवक व कार्यकर्ता) यांनी राज्यभरातील लोहार समाजातील बांधवांना मोठ्या संख्येने आझाद मैदान, मुंबई येथे उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. आंदोलनस्थळी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून पुढील आंदोलनाची दिशा शासनाच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे आयोजकांनी सांगितले.










