भाजी वाल्याचा मुलाचे घवघवीत यश 93.40% पाडून केले वडिलांच्या कष्टयाचे केले चीज.
प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे
लहू गर्जना ग्रुप युवा संघटना चे पदाधिकारी श्री नितीन खुडे यांचे सुपुत्र *शालोम नितीन खुडे* याला इयत्ता दहावी च्या परीक्षेत 93.40% गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या बद्दल लहू गर्जना ग्रुप युवा संघटना चे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र तानाजी कांबळे याच्या कडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर याची प्रतिमा देऊन तसेच लहुजी शासन चे संस्थापक अध्यक्ष सनी भाऊ डाडर याच्या कडून क्रांतिगृरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा देऊन अभिनंदन करण्यात आले.शालोम नितीन खुडे याने अतिशय हालाकीच्या परिस्थितीत कोणताही क्लास न लावता घरी अभ्यास करून अतिशय मेहनतीने अभ्यास करून हे यश प्राप्त केले आहॆ. नितीन खुडे हे भाजीचा व्यवसाय करीत असताना त्यांच्या कष्टाचे सार्थक झाले अशी भावना आहॆ.











