अंजनगाव सुर्जी.तालुका प्रतिनिधी इमरान सौदागर दिनांक : 10 एप्रिल 2026
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अंजनगाव ते दर्यापूर रोड वरील ,विहिगाव, हे गाव मोठे बाजारपेठेचे गाव आहे. गावात जाणारा एक किलो मीटर रस्ता अत्यंत जिवघेणा झाला असुन रोज या रस्त्याने गावातील नागरिकांची विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. खड्डे रस्त्या मुळे नागरिकांना मोठा या खड्डेमय रस्त्यामुळे जीवितहानी होऊ शकते. रस्ताचे काम करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ,(पत्रकार) फिरोज कुरैशी, यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सुद्धा दिले आहे. परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांने याची दखल घेतली नाही. नाईलाजाणे फिरोज कुरेशी, व भगवान अभ्यंकर अन्य गावातील नागरिकांनी महिलांनी व शाळकरी मुलांनी उपोषण करण्याचा दि.13/4/ 2026 रोजी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.या बाबतची लेखी निवेदन विनंती अर्ज तहसीलदार अंजनगाव सुर्जी सार्वजनिक बांधकाम अंजनगाव सुर्जी मा.खासदार बंलंवत वानखडे मा. आमदार गजानन लवटे,यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे, वारंवार तालुक्यात रस्त्या मुळे अपघाताच्या घटना घडत आहेत वाहन चालक व इतर नागरिक खड्डेमय रस्त्याला त्रासलेले आहेत विद्यमान खासदार यांनी तत्काळ लक्ष घालून झालेल्या निष्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी व डांबरी रस्ता करून द्यावा अशी मागणी केली आहे, अन्यथा उपोषण कर्त्याच्या जीवाला कोणतीही ,जिवित हानी झाल्यास संबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इंजिनिअर जबाबदार राहतील असे त्यांनी लेखी पत्र द्वारे कळविले आहे तत्काळ संबंधी विभागाने दखल घ्यावी व उपोषण मागे घेण्यास प्रवृत्त करावे अशी मागणी जनसामान्य नागरिकांनी मत व्यक्त केले आहे .







![मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य [ Human Right Council ]](https://bolmaharashtranews.online/wp-content/uploads/2026/04/547538-1-190x122.jpg)


